आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दुचाकींची धडक; एक ठार, 2 जण गंभीर जखमी:नागपूर-मुंबई महामार्गावरील करंजगावजवळ अपघात

बोरदहेगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन मोटारसायकलींची समाेरासमाेर जाेराची धडक हाेऊन एक जण जागीच ठार, तर दाेन जण गंभीर जखमी झाले. ही घटना वैजापूर तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गावरील करंजगावजवळील कर्मभूमी आश्रमाजवळ गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. चांदमियाँ छोटुमियाँ मन्सुरी (५१, रा. परसाेडा, ता. वैजापूर) असे मृताचे नाव असून रशीद शेख (३२, रा. परसाेड) व किशोर पोपट हुमे (२८, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) हे दाेघे गंभीर जखमी झाले आहेत.

लासूर स्टेशनहून मिरकनगर परसोडाच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच २० एफसी १३४७) चांदमियाँ मन्सुरी व किशाेर हुमे हे जात हाेते. करंजगावजवळील कर्मभूमी आश्रमाजवळ आल्यानंतर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीची (एमएच २० इव्ही ४८३९) समाेरासमाेर जाेराची धडक झाली. या भीषण अपघातात परसोडा येथील चांदमियाँ मन्सुरी हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले रशीद शेख आणि समाेरील माेटारसायकलीवरील किशाेर हुमे हे गंभीर जखमी झाले. जखमींना वैजापूर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. वैजापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदवण्याची प्रक्रिया सुरू हाेती. तपास पाेलिस करताहेत.

बातम्या आणखी आहेत...