आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे नुकसान:लिटिल फ्लाॅवर हायस्कूल केंद्रावर नऊ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांवर उडाला रंग

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छावणी परिसरातील लिटिल फ्लाॅवर हायस्कूल परीक्षा केंद्रात ९ विद्यार्थ्यांच्या इंग्रजीच्या उत्तरपत्रिकांवर रंगाचे शिंतोडे उडून काही पाने खराब झाल्याचा प्रकार सोमवारी घडला. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे क्रमांक बोर्डाला कळवणार आहोत, अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.

दहावीच्या लेखी परीक्षेस २ मार्चपासून सुरुवात झाली असून, सोमवारी इंग्रजी भाषा विषयाचा ११ ते २ या वेळेत पेपर होता. शहरातील छावणी परिसरातील लिटिल फ्लाॅवर हायस्कूल परीक्षा केंद्राच्या आवारात काही जण होळीनिमित्त रंग खेळत होते. या वेळी एका तरुणाने रंगीत पाण्याचे फुगे वर फेकले. त्यामुळे हे फुगे परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन आदळल्याने त्यातील रंगांचे शिंतोडे विद्यार्थ्यांच्या पेपरवर उडून इंग्रजीची उत्तरपत्रिका खराब झाली.

बोर्डाच्या नियमानुसार उत्तरपत्रिकेत खाडाखोड करणे, खुणा करणे, नंबर लिहिणे आदी गैरप्रकार मानले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. मात्र, यात विद्यार्थ्यांची काही चूक नसल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रास विद्यार्थ्यांचे क्रमांक बोर्डाला कळवून झालेल्या प्रकाराची माहिती मागवली आहे.

एकाही विद्यार्थ्याचे नुकसान हाेऊ देणार नाही केंद्रावरील ९ मुलांच्या उत्तरपत्रिकेवर रंगाचे शिंतोडे उडाले आहेत. ही माहिती केंद्राने कळवली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यासाठी त्यांचा आसन क्रमांक बोर्डाला कळवल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...