आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक आमदार आणि सर्व संघटना एकवटल्या:आ. बंब यांच्याविराेधात शिक्षकांचा आज मोर्चा

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर-खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. त्यामुळे आता पदवीधर आमदार, सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. बंब यांच्याविरोधात ११ सप्टेंबर राेजी सकाळी ११ वा. आमखास मैदानातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुख्यालयी न राहता बहुतांश शिक्षक खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात, शासनाची फसवणूक करतात, असा आरोप आ. बंब यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. तेव्हापासून बंब विरुद्ध शिक्षक असा संघर्ष सुरू आहे. बंब यांनी माफी मागावी अशी शिक्षकांची मागणी आहे. मात्र, बंब आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ५ सप्टेंबरला बंब यांनी गांधीगिरी करत मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व पूजन करत पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटवली. पिढी बरबाद करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक व पदवीधर आमदार पाठीशी घालतात, असा आरोप करत त्यांचे मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करत या आमदारांचाही रोष ओढवून घेतला. त्यामुळे शिक्षकांसह पदवीधर व शिक्षक आमदार आक्रमक झाले आहेत. मोर्चाचे नेतृत्व शिक्षक आ. विक्रम काळे, आ. कपिल पाटील, पदवीधरचे आ. सतीश चव्हाण, अहमदनगरचे आ.डॉ. सुधीर तांबे करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...