आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी मिळेल:अमेरिकेत शिकायला या, अन्न प्रक्रिया उद्योगात नोकरी मिळेल

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. आम्ही आता ‘व्हिसा’च्या काही अटी शिथिल केलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी यावे. तिथे अन्न प्रक्रिया उद्योगात नोकरीची चांगली संधी असल्याची माहिती अमेरिका दूतावासातील अधिकारी जॉब अ‍ँडरसन यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्यांनी गुरुवारी संवाद साधला. या वेळी अल्मित्रा किका, कला व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती. अँडरसन म्हणाले, ‘स्थानिक आणि अमेरिकन विद्यापीठाचे संबंध वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. कोविडमुळे भारतातून व्हिसाच्या अटी कडक होत्या. आता त्या शिथिल केल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी तिथे शिक्षणासाठी यावे. तिथे नोकरी आणि उद्योगाची संधी आहे.’ शेवटी प्रश्नोत्तरे झाली. सिफार्टच्या कार्यक्रमापूर्वी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांची त्यांनी भेट घेतली. डॉ. शुजा शाकेर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

वंशवादावर चिंता एका विद्यार्थ्याने अमेरिकेत वंशवाद अधिक असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यावर अॅण्डरसन म्हणाले, प्रत्येक विकसित देशात ही समस्या असतेच. अमेरिकेत तुलनेने वंशवाद कमी आहे.