आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठाकडून ईडीला नोटीस:आ. कराडांची बेहिशेबी मालमत्ता पण कराड कुटुंबीय भाजपचे, म्‍हणून इडी कारवाई नाही असा आराेप

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील एमआयटी ग्रुपचे संचालक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, त्यांचे पुतणे भाजपचे आमदार रमेश कराड यांच्यासह कुटुंबातील पाच जणांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सामाजिक कार्यकर्ते विनायक श्रीपती कराड यांनी अर्ज केला होता.

संबंधिताच्या अर्जावर विचार करण्यात आला नसल्याने अर्जदाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. राजेश पाटील यांनी ईडीला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीत २० सप्टेंबर २०२२ पर्यंत कराड कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. विश्वनाथ कराड, पुतणे आ. रमेश कराड, राजेश काशीराम कराड, काशीराम दादाराव कराड व तुळशीराम दादाराव कराड यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी विनायक श्रीपती कराड यांनी सक्तवसुली संचलनालय दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र कारवाई झाली नाही. कराड कुटुंबीय भाजपचे असल्याने त्यांच्याविरुद्ध ईडी कारवाई करत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला.

बातम्या आणखी आहेत...