आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू:पहिली ते नववीच्या परीक्षांना प्रारंभ; 12 जूनपासून शाळा उघडणार

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर आता पहिली ते नववीच्या वर्गाच्या परीक्षांना सुरुवात झाली, तर कनिष्ठ महाविद्यालयांतही अकरावीच्या परीक्षांचे नियोजन केल्याची माहिती शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी दिली. दरम्यान, उन्हाळी सुटीनंतर राज्यभरात १२ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू हाेणार आहे. विदर्भ वगळता २०२३-२०२४ शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून होणार आहे. सर्व वर्गांचे निकाल २० ते २५ एप्रिलपर्यंत तयार करून ३० किंवा २९ एप्रिलला जाहीर करण्यात येतील. त्यानंतर शाळांना १ मेपासून उन्हाळी सुट्या देण्यात येतील. या सुटीचा कालावधी ११ जूनपर्यंत राहील. उन्हाळ्याची व दिवाळी, नाताळ, विविध उत्सव या सुट्यांचे नियोजन शाळांनी करून घ्यावे, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकूण ७६ दिवसांपेक्षा अधिक सुट्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.