आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराॲडव्हान्स इन काॅम्प्युटर व्हिजन अँड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नाॅलाॅजी या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या हस्ते सोमवारी सकाळी विद्यापीठातील नाट्यगृहात पार पडले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. कारभारी काळे यांच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
मानपत्राचे वाचन परिषदेचे अध्यक्ष प्रा. रमेश मंझा यांनी केले. या परिषदेच्या आयोजनाची भूमिका त्यांनी विषद केली. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्राचे समाजाच्या उपयोगात महत्त्वाचे स्थान निर्माण होत आहे. या क्षेत्रात संशोधनात वाव असून, विद्यापीठातील संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापकांचे संशोधन अभिमानास्पद असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले उद्घाटनपर भाषणात म्हणाले.
उद्घाटनप्रसंगी किशोर शितोळे, प्रा. पराग कुलकर्णी, प्रा. पी नागभूषण, प्रा. पी शिवकुमार, प्रा. रत्नदीप देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेपूर्वी रविवारी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. प्रा. अमिया त्रिपाठी, संजय शितोळे, प्रा. संगीता चौधरी, प्रा. सफियोद्दीन यांच्यासह मान्यवरांनी संशोधनपर मार्गदर्शन केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागासह कर्टीन युनिव्हर्सिटी मलेशिया, राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, एसएनडीटी विद्यापीठ मुंबई, विवेकानंद महाविद्यालय, एमजीएम विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत 75 पेक्षा अधिक शोधनिबंध सादर झाले. यावेळी प्रा. रत्नदीप देशमुख, डाॅ. रमेश मंझा, डाॅ. अशोक गायकवाड, प्रा. भारती गवळी, प्रा. प्रवीण यन्नवार, प्रा. नम्रता महेंदर, प्रा. सोनाली कुलकर्णी, प्रा. मानसी बाहेती यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.