आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरफायदा:व्यावसायिक नळांना मीटर बसवणे सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्याचा अपव्यय कमी व्हावा म्हणून मनपाने नळ कनेक्शनला मीटर बसवण्याचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक नळांना मीटर बसवण्यात येत आहेत. शहरातील नळ कनेक्शनची यादी सध्या मनपाकडे उपलब्ध नाही. व्यावसायिक नळाद्वारे बेसुमार पाणी उपसा करून त्याची विक्री सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आलेत. काही व्यावसायिक नळ कनेक्शन तोडण्यात आले. मात्र, असे नळ कनेक्शन किती इंचांचे घेतले हाेते, याची नोंद कुठेही नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जात आहे.

त्यामुळे मनपा प्रशासकांनी व्यावसायिक नळांना मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. मनपाने समांतर पाणीपुरवठा योजनेत खरेदी केलेले पाच हजार मीटर शिल्लक असून ते चांगल्या अवस्थेत आहेत. व्यावसायिक नळांना मीटर बसवण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने अद्यापही कनेक्शनधारकांची यादी तयार केलेली नाही. त्यामुळे प्रशासकांनी बैठक घेऊन तातडीने यादी तयार करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...