आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुलीची मोहीम हाती:भारत बाजार, जाधववाडीतील व्यावसायिक मालमत्ता सील

छत्रपती संभाजीनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकातर्फे निवासी व व्यावसायिक मालमत्ताधारकांकडील थकीत मालमता कर व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मंगळवारी भारत बाजार व जाधववाडी येथील व्यावसायिक मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रभाग पाचच्या सहायक आयुक्त सविता सोनवणे यांच्या पथकाने भारत बाजार एमआयडीसी चिकलठाणा येथील अमित झंवर यांची मालमत्ता सील केली. त्यांच्याकडे १ लाख ७५ हजार ६९३ रुपयांचा कर थकलेला आहे.

याच ठिकाणी प्रकाशवती मित्तल यांचीही व्यावसायिक मालमत्ता सील केली. त्यांच्याकडे १ लाख २० हजार ९३७ रुपयांचा कर थकीत आहे. जाधववाडी फळ भाजीमार्केट येथील मोहंमद अश्फाक बागवान यांच्याकडे २ लाख ९८ हजार ९१८ रुपये कर थकीत होता. त्यांची मालमत्ता सील केली. ही कारवाई अधीक्षक मुकुल बांगर, सचिन सोनी यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...