आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 पंपांच्या उभारणीची प्रक्रिया थांबली:पेट्रोल पंप सुरू करण्यास आयुक्तांचा ‘रेड सिग्नल’

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी इंडियन ऑइलसोबत करार करून शहरात सेंट्रल नाका येथे ‘प्रगती’ हा पेट्रोल पंप सुरू केला. दीड वर्षात या पंपाने ६५ लाख रुपयांची कमाई करून दिली. हा प्रतिसाद पाहून नवीन चार पेट्रोल पंप उभारण्याची तयारी मनपाने सुरू केली होती. मात्र, आयुक्तांनी त्याला परवानगी नाकारली आहे. सेंट्रल नाका पेट्रोल पंपाची जागा मनपाची आहे. त्यासाठी मनपाला प्रतिमहिना दीड लाख रुपये भाडे व प्रतिलिटर तीन रुपये मिळतात.

यातून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन मनपाने देणे अपेक्षित आहे. पेट्रोल पंपाला मिळालेला प्रतिसाद पाहून हर्सूल जकात नाका, गरवारे स्टेडियम, कांचनवाडी आणि पडेगाव येथे पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार होते. त्यासाठी जागा निश्चित केली होती. कंपनीने नियोजनदेखील सुरू केले होते. यातून मनपाला अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली होती. शिवाय रोजगारनिर्मितीदेखील झाली होती. मात्र, मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी नवीन पंप सुरू करण्यास मनाई केल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...