आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा 9.4 अंशांवर, रात्री थंडी वाढली:राज्यातील 18 शहरांच्या तुलनेत औरंगाबादचे तापमान सर्वात कमी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील प्रमुख १८ शहरांच्या तुलनेत औरंगाबादचे किमान तापमान सर्वात कमी ९.४ अंश सेल्सियस नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी ते कमी राहिले. सायंकाळ ते सकाळच्या सत्रातील थंडीचा कडाका किंचित वाढला आहे, तर दुपारच्या सत्रातील उकाडा अजूनही कायम आहे. वातावरणातील अस्थिर परिस्थितीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.

ला निनाच्या प्रभावामुळे बाष्पयुक्त वारे वाहून येत आहेत. रविवारी उत्तरेतील अतिशीत वाऱ्यांचा वेग वाढला होता. परिणामी ३१ डिसेंबर रोजी १३.२ अंश असलेले तापमान १०.१ अंशावर, सोमवारी किंचित घसरण होऊन ते ९.४ अंश खाली आले. ३० डिसेंबरला कमाल तापमान ३१.६ अंश म्हणजे सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी जास्त होते. सोमवारी ते ३०.० अंश नोंदवले गेले. अतिशीत वाऱ्याचा वेग वाढला तर तापमान आणखी नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. तसेच थंड, उष्ण, बाष्प वाऱ्याचा संगम हाेऊन ढग जमा झाले तर तापमानात चढउतार हाेईल.

बातम्या आणखी आहेत...