आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नुकसान भरपाईची मागणी:पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; आमदार सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आ. चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यात जून 2020 मध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची शंभर टक्के पेरणी केली. मात्र 15 जुलै पासून औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने कापुस, मका, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मशागत करून उधारीवर खत व औषधींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. परंतू खरीप पिकांचे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांना शेती उत्पादनातून काही आर्थिक लाभ होईल असे वाटत नाही.

आधीच कोरोनाच्या महामारीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीची भर पडली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.