आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी नुकसान:मराठवाड्याला प्रसंगी कर्ज काढून 4 हजार कोटींची नुकसान भरपाई : उपमुख्यमंत्री अजित पवार

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीने मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टरपैकी ३२ ते ३६ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हिशेब केल्यास नुकसान भरपाईसाठी साधारणत: चार हजार कोटी रुपये लागणार आहेत. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी कर्ज काढून ही भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे विभागीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, ४ पालकमंत्र्यांनी मराठवाड्याला मदतीची मागणी केली. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीनंतर माहिती घेण्याची सूचना पुनर्वसन विभागाला दिली. निर्णय मुख्यमंत्री घेतील. खरिपात पीक कर्ज घेऊन वेळेत फेडणाऱ्यांना शून्य टक्के व्याज लावायचे, असा निर्णय घेतला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे वेळेत कर्जफेड कठीण आहे. त्यांचे पीकच राहिले नाही. दुष्काळात कर्जाचे पुनर्गठन करून पुढील कर्जासाठी पात्र ठरवतो. तो निर्णयही घेतला जाणार आहे.

केंद्राने पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतर भरपाई वाटप
मंत्री अजित पवार म्हणाले की, पीक विम्याच्या पहिला हप्त्यापोटी राज्य सरकारने ९७४ कोटी रुपये दिले आहेत. केंद्र सरकारचा हप्ता येणे बाकी आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची काल बैठक झाली. त्यात राज्य सरकारने हप्ता भरल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तीन दिवसांत केंद्राकडून सुमारे एक हजार कोटींचा हप्ता भरला जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात होईल.

बातम्या आणखी आहेत...