आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:विद्यापीठातील महिलेची तक्रार, प्रा. अंभोरेंवर विनयभंगाचा गुन्हा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उच्चपदस्थ महिलेच्या तक्रारीवरून प्रा. शंकर अंभोरे (५७), कार्यकर्ता नागराज चांदोबा गायकवाड (५२) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. विद्यापीठात एका नियुक्तीवरून मागील अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे.

आता प्रकरण बेगमपुरा पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. यात ५४ वर्षीय महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे की, नागराज व अंभोरे यांनी मिळून त्यांची नाहक बदनामी सुरू केली. मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने सतत आत्मदहनाचा इशारा देणे, उपोषण करण्याचे प्रकार सुरू केले. माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध करून विद्यापीठांमध्ये कुठलेही काम नसताना कार्यालयात चकरा मारू लागले. वाईट नजर टाकून लज्जा वाटेल असे कृत्य करणे सुरू केले. शासकीय निवासस्थानाबाहेर गाडीचा हॉर्न वाजवून घराकडे पाहिले. या तक्रारीचा पुढील तपास फौजदार ज्योती गात करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...