आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:घरात घुसून हल्ला करत सर्व साहित्य लांबवल्याची तक्रार; गुन्हा दाखल

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन-२ मधील टेनिस कोर्ट व त्याजवळच असलेल्या घराच्या वादातून बुधवारी एका कुटुंबाने आमच्या घरात घुसून हल्ला करत सर्व साहित्य लंपास केले. तसेच संशयितांनी टेनिस कोर्टचेही लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात विजेंद्र पाटील व त्यांच्या मुलासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलोनी राजेंद्र डंगवाल (२२) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘आपण २२ वर्षांपासून आई-वडील, आजी व भावासह तेथे राहतो. ७ डिसेंबर रोजी मी आणि माझी आजी घरी असताना विजेंद्र पाटील व त्यांच्या मुलासह १५ ते २० जणांनी आमच्या घरात प्रवेश केला. त्यांनी आम्हाला मारहाण करत मोबाइल हिसकावले. शिवाय, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, बेड, संगणक, टेबल, सोन्याचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, पेन्शनशी संबंधित फाईल असे सर्व साहित्य नेले.’ पोलिसांनी चौकशी करून त्यांना ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.

दरम्यान, सलोनी यांच्या घराजवळील टेनिस कोर्टच्या नुकसानीप्रकरणी स्वतंत्र तक्रार घेत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारीच एन-२ क्रिकेट मैदानाच्या बाजूला असलेल्या त्यांच्या टेनिस कोर्टवर संशयितांनी जेसीबी घेऊन प्रवेश करत सुरक्षा जाळी, मेन गेट, चार खांबांची तोडफोड केली अन् ते पसार झाले.

बातम्या आणखी आहेत...