आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा:काँग्रेस विमा कक्षामध्ये 2500 शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे एक डिसेंबरला काँग्रेसच्या वतीने पीक विमा मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये गेल्या सात दिवसात २५०० जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. वस्तुत: किमान एक लाख तक्रारी येतील, अशी अपेक्षा होती. काँग्रेसची यंत्रणा शेतकऱ्यांमध्ये कक्षाविषयी जागृती करण्यात कमी पडत असल्याचे म्हटले जात आहे. कारण विमा कंपन्यांकडे २ लाख १ हजार २५८ शेतकऱ्यांची तक्रार आधीच केली आहे. सोळा डिसेंबरपर्यंत काँग्रेसच्या कक्षात येणाऱ्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...