आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहाचा निधी गेला कुठे:शहरातील अस्वच्छतेवर माजी नगरसेवकांनी मांडल्या तक्रारी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अस्वच्छतेवर माजी नगरसेवकांनी टीका करत लवकरात लवकर स्वच्छता करण्याची मागणी केली. यामध्ये शहरात स्वच्छतागृहांचा आभाव, वारंवार फुटणारे ड्रेनेज कधी दुरुस्त करणार, असा सवाल महानगरपालिका प्रशासनाला विचारला आहे.

स्वच्छतागृहासाठी उदासीन धोरण शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही, ती कधी करणार? स्वच्छता-गृहासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. तो गेला कुठे? औरंगपुरा भागात महिलांसाठी स्वच्छतागृह तयार करण्यात आले होते. तेही दीड महिना सुरू होते. स्वच्छतागृह तयार करण्यास मनपा प्रशासन उदासीन आहे. स्मिता घोगरे, माजी उपमहापौर

अडीच वर्षांपासून ड्रेनेजची दुरुस्ती नाही नगरसेवकांचा कार्यकाळ संपून तीन वर्षे झाली आहेत. त्यात ड्रेनेजलाइनच्या देखभाल-दुरुस्तीचे टेंडरही पूर्ण झाले. मात्र काम झाले नाही. ड्रेनेजलाइन चोकअप झाल्याने पिण्याच्या पाण्यात घाण पाणी मिसळते. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. अश्फाक कुरेशी (माजी नगरसेविका रेश्मा कुरेशी यांचे पती)

ड्रेनेजचे पाइपलाइन कधी बदलणार आमच्या वाॅर्डात पाण्याची समस्या आहे. मोठी पाइपलाइन टाकायला हवी. ड्रेनेजचे काम करावे. दर चार दिवसांनी ड्रेनेजलाइन चोकअप होते. घाण पाणी रस्त्यावरून वाहते. नागरिकांना याचा त्रास होत आहे. ड्रेनेजलाइन जीर्ण होत चालली आहे. ती दुरुस्त करून चालणार नाही, आता नवीन लाइन टाकण्याची गरज आहे. - शोभा बुरांडे, माजी नगरसेविका

शहरात स्वच्छतागृह नसल्याने अडचणी; सुविधा द्या सहा वर्षांपासून ८ सुलभ शौचालये बांधण्यासाठी ५ कोटी आले होते. मात्र एस्टिमेट तयार झाले नसल्याने निधी परत गेला. ते कधी बांधणार आहात? शहरात लोकांना अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाची गरज आहे. शहर वाढत आहे. लोक नोकरीनिमित्त बाहेर पडत आहेत. परंतु मोठमोठ्या बाजारपेठांत स्वच्छतागृह नसल्याने त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. - अरुण बोर्डे, माजी विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांचे पती

बातम्या आणखी आहेत...