आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेरूळ येथे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले जयंतीनिमित्त महोत्सव समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर संस्थानचे श्रीमंत मुधोजीराजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊ यांचे वंशज राजे शिवाजीराव जाधवराव हे उपस्थित होते. शहाजी राजे भोसले यांचे स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यास सांगितले.
माजी खासदार चंद्रकांत खैरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी प्रा. प्रदिप सोळुंके लिखित स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांचे जीवनी वरील पुस्तकाचे विमोचन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.
सोळुंके यांनी शहाजीराजे भोसले यांच्या इतिहासाच्या अनेक बाबीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वारोहण आणि अभिवादन करून राष्ट्रमाता जिजाऊ यांचे वंशज राजे शिवाजीराव जाधवराव हे यांचे हस्ते झाले. तर महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आणि दीप प्रज्वलन करून श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण सुयोग अंभोरे, आंदोलनकर्ते मनोज जरांगे,प्राचार्य कणसे यांचा सत्कार करण्यात आला. राजे शिवाजीराव जाधवराव म्हणाले की,भोसले कुटुंबाचा जाज्वल्य इतिहास जगभर पोहचविण्यासाठी या गढीचा आणि स्मारकाची निश्चित अशी भुमिका असल्यामुळे अधिक गतीने हे स्मारक पूर्णत्वाकडे जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना श्रीमंत मुधोजीराजे भोसले म्हणाले की, भोसले कुटुंबियांची या गढीसाठी असलेली 192 एकर जागा आम्हीं उपलब्ध करून दिलेला असुन या साठी एका ट्रस्टची राष्ट्रीय स्तरावरील स्थापना कऱण्यात येणार असुन या ठिकाणी निर्माण होणाऱ्या स्मारकासाठी अथक परिश्रम घेणारे किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, विलास पांगरकर यांचे विशेष कौतुक केले. चंद्रकांत खैरे म्हणाले की, मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना गढीच्या विकासास चालना देण्याचे काम सुरू झाले होते.हा ऐतिहासिक प्रकल्प पुर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.