आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी आयुक्तांनी झापले:कल्याणकारी योजनेची कामे वेळेत पूर्ण करा, अनुदान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, अन्यथा खैर नाही

औरंगाबाद I संतोष देशमुख21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अर्धवट झालेली आहे. अर्धवट कामे व अनुदान कागदावरच शिल्लक राहिले आहे. यावर कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून विभागातील कृषी अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करावी, कल्याणकारी योजनेची कामे वेळेत पूर्ण करावे, अनुदान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, अन्यथा तुमची काही खैरे नाही, असा निर्वाणीचा इशारा आज दिला आहे.

खरीप आढावा बैठक

शुक्रवारी (ता. 10 ) पैठण रोडवरील एनआरपीच्या सभागृहात दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्याचे कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्ष कृषी अधिकारी, तालुका कृषी, उपविभगीय कृषी अधिकारी उपस्थित होते.

लाभार्थ्यांचे अनूदान कागदावरच

बैठकीत जिल्हानिहाय राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कामांचे उद्दिष्टे व प्रत्यक्षात झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची कामे अर्धवट असून लाभार्थ्यांचे अनुदान कागदावरच राहिले आहे. याबाबत आक्रोश सुरु झाला आहे.

टोपेंनी केली होती नाराजी व्यक्त

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. शेतकरी विष्णु पवार यांना 2019 पासून सिंचन योजनेचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार केली. तर कृषी आढावा बैठकीतही याच विषयावर सर्वाधिक चर्चा झाली.

आयुक्तांनी जिल्हा अधीक्षकांना झापले

कृषी आयुक्तांनी गलथान कारभारा विरोधात जिल्हा अधीक्षकांना चांगलेच झापले. 20 टक्क्यांपेक्षा जास्त निधी शिल्लक असल्यास तो निधी थेट जमा करून टाकेल. त्यामुळे वेळेत सर्व कामे पूर्ण करून लाभार्थ्यांपर्यंत अनुदानाचा लाभ पोहोचवा. जे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशाराच त्यांनी दिला. थेरॉटिकल, प्रॅक्टिकल, सॉफ्टवेअरचा इशू असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...