आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प:सफारी पार्क, स्मार्ट स्कूलचे काम लवकर पूर्ण करा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटीमार्फत शहरात सुरू असलेल्या सफारी पार्क, स्मार्ट स्कूल, लाइट हाऊस, शिवसृष्टी या कामांची शुक्रवारी स्मार्ट सिटीचे संचालक, उद्योजक उल्हास गवळी, भास्कर मुंढे यांनी पाहणी केली. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संचालकांनी केल्या. सफारी पार्कचे दुसऱ्या टप्प्यांतील कामे प्रगतिपथावर आहे. ५० स्मार्ट स्कूलचे कामदेखील सुरू आहे. लाइट हाऊस प्रकल्प रोजगारनिर्मिती करत आहे. शिवसृष्टीचे काम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान यांनी या प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्यासह कंत्राटदार एजन्सीचे प्रतिनिधी, स्मार्ट सिटीचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...