आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती:ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांमुळे राज्यात चिंता; अहमदनगरमध्ये 13, कल्याण-डोंबिवलीत 55, तर रत्नागिरीत 10 जण परतले

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपुरातील तरुण कोरोना बाधित, 10 संशयित; नाशकात 171 प्रशिक्षणार्थी बाधित

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच लंडनहून परतलेल्या प्रवाशांमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. नगर जिल्ह्यात १३, रत्नागिरी १०, कल्याण-डोंबिवलीमध्ये ५५ जण लंडनहून परतले आहेत. तर नागपुरात ब्रिटनहून परतलेला एक तरुण कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापैकी ११ प्रवासी नगर जिल्ह्यात असून दोन मुंबईत आहेत. या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे. त्यांचा अहवाल शुक्रवारी (२५ डिसेंबर) येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या महिनभरात इंग्लंडहून ५०४ प्रवासी आले असून नाशिकमध्ये ६८ प्रवासी आले असून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोना चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत गुरुवारी युरोप आणि आखाती देशांतून १२०६ प्रवासी दाखल झाले असून त्यापैकी ७०८ प्रवाशांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

नागपुरातील तरुण कोरोना बाधित, १० संशयित

नागपूर | ब्रिटनहून परतलेला तरुण पुण्यातील एका कंपनीत जॉबला आहे. कंपनीच्या कामानिमित्त तो ब्रिटनला गेला होता. २९ नोव्हेंबरला तो नागपुरात आला. तिथून तो गोंदियाला गेला. त्याच्या संपर्कातील १० जण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीयसुद्धा क्वाॅरंटाइन झाले. मात्र या तरुणाला नेमका कोणता कोरोना झाला, हे तपासण्यासाठी त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत.

नाशकात १७१ प्रशिक्षणार्थी बाधित

नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण अकादमीत गेल्या आठ दिवसांत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोनाबाधित आढळले असून गुरुवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हा आकडा १७१ वर गेला आहे. त्यापैकी १२१ प्रशिक्षणार्थींना ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...