आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलार ऊर्जेतील गुंतवणूक ही वर्तमानासोबत भविष्यासाठीही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. मात्र, याबाबतची पुरेशी माहती नसणे, शासकीय कार्यालयामध्ये अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणे, निकृष्ट दर्जाच्या उत्पादनाचे बळी पडणे यासारख्या नकारात्मक कारणांमुळे अनेक नागरिक इच्छा असूनही आपल्या घरावर सोलार पॅनल बसवू शकत नाहीत. यात सवलतीऐवजी माफक व्याजदराने कर्ज उपलब्ध झाल्यास नागरिकांचा ओढा वाढेल, असा विश्वास शहरातील ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संघटनेचे पदाधिकारी आणि सोलार वितरक यांच्याशी दैनिक दिव्य मराठीने साधलेल्या संवादातून पुढे आलेल्या महत्त्वाच्या मागण्या अशा :
सबसिडीऐवजी कर्जाची गरज सबसिडीऐवजी सोलारसाठी कर्ज उपलब्ध करून दिले तर ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. महिन्याला येणाऱ्या बिला प्रमाणे रक्कम कर्जाच्या रूपात कपात होईल. - प्रीतम गुगळे
तात्पुरता नव्हे तर दूरचा विचार करावा सोलार पॅनल बसवतेवेळी तात्पुरता विचार करून हलक्या दर्जाची सिस्टिम न बसवता दूरचा विचार करत गुणवत्ता व विश्वासार्हता बघावी. - सुजित जैन
शासनाने प्रचार-प्रसार वाढवावा जेवढा अधिक सोलारचा वापर सर्वसामान्य नागरिकांतून होईल तेवढा अधिक शासनाला फायदा होईल. शासनाने जनजागृती करावी. सोलार उपयुक्ततेचा प्रचार करावा. -डी.बी. मगर
निकृष्ट उपकरणापासून सावध राहा नवखी कंपनी मार्केटमध्ये येते, पॅनल बसवून नफा कमावून निघून जाते वर्षभरातच पॅनलच्या दुरुस्तीचे काम निघते. नवीन कामांपेक्षा दुरुस्तीचीच कामे अधिक येत आहेत. - विजय जैन
प्रशासनाकडे नोंद झाली पाहिजे पॅनल बसवले की शासनदरबारी त्यांची नोंद त्यांच्याच यंत्रणेकडून झाली पाहिजे. त्यानुसार सुविधा व फायदे मिळाले पाहिजेत. ग्राहकाला चकरा मारण्याची गरज भासू नये. शेखर देशमुख
बंद पडलेली सबसिडी सुरू करावी बंद पडलेली सबसिडी पूर्ववत सुरू करावी आणि त्यात वाढही करावी. त्यामुळे मागील काळात सोलार बसवणाऱ्या ग्राहकांमध्ये आलेली नकारात्मकता दूर होऊन ग्राहकांमध्ये वाढ होईल. - अमित भुमा
बंद पडलेली सबसिडी सुरू करावी बंद पडलेली सबसिडी पूर्ववत सुरू करावी आणि त्यात वाढही करावी. त्यामुळे मागील काळात सोलार बसवणाऱ्या ग्राहकांमध्ये आलेली नकारात्मकता दूर होऊन ग्राहकांमध्ये वाढ होईल. - अमित भुमा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.