आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडक कारवाई:किराडपुरा दंगलीची नि:पक्ष चौकशी करा ; कुल जमाती विकाफची मागणी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किराडपुरा राममंदिर परिसरात ज्या युवकांनी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरत दंगलीची सुरुवात केली अशा दंगलखोरांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, निष्पाप युवकांवर गुन्हे दाखल करू नये, मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाइ करण्यात यावी, मुस्लिम धर्मगुरूंवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्यांचे निवेदन कुल जमाती विफाक या संघटनेतर्फे पोलिस आयुक्तांना देण्यात आले. या वेळी कुल जमाती विफाकचे अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दीकी, अवेस अहेमद, मुन्तजिब शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.