आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाचा यंदा हीरकमहोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने ‘जैविक संसाधन’ विषयावर ७ व ८ जानेवारीला राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. विभागाच्या जडणघडणीत ज्या प्राध्यापकांनी योगदान दिले, त्यांचा यानिमित्ताने सन्मान करणार असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दिली.
राष्ट्रीय परिषदेचे वनस्पतिशास्त्र विभागात कुलगुरू प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेत सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. विविध सत्रांत २१८ शोधनिबंध सादर होतील. भोपाळ येथील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए. के. पांडे यांचे उद््घाटकीय सत्रात बीजभाषण होईल. या वेळी गोव्यातील पणजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. जनार्दनन पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. विभागातील सात माजी प्राध्यापकांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करणार आहे. त्यामध्ये प्रा. वर्षा नाठार, प्रा. प्रशांत गावंडेआदींचा समावेशआहे. देशभरातून २१८ शोधनिबंध प्राप्त झाले.
८ जानेवारी रोजी होणार परिषदेचा समारोप
चर्चासत्रासाठी व्याख्याते म्हणून पुणे विद्यापीठाचे प्रा. मिलिंद सरदेसाई यांच्यासह इंदूर विद्यापीठाचे डॉ. सुदीप रॉय, हैदराबाद विद्यापीठातून डॉ. किरणकुमार, कुलसचिव डॉ. भगवान साखळे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील. ८ जानेवारीला परिषदेचा समारोप केला जाणार आहे. या वेळी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. अशोक चव्हाण आणि आयोजक प्रा. अरविंद धाबे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.