आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:जी-20 परिषदेनिमित्त होणार महिला सक्षमीकरणावर परिषद

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या जी-२० देशांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने विविध शहरांत त्यांचे प्रतिनिधी जाणार आहेत. औरंगाबादमध्ये १३ किंवा १४ फेब्रुवारीला ही परिषद होणार आहे.विशेष म्हणजे या परिषदेच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणावर शहरात स्वतंत्र परिषद होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय यांनी दिली.

औरंगाबाद शहरात जी-२० परिषदेच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्यासोबतच शिष्टमंडळांसाठी ५० इलेक्ट्रिक कार आणि १० बससह चार हॉटेल्समध्ये रूम आरक्षित केल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबादमध्ये जी-२० देशाचे प्रतिनिधी येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...