आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय स्त्रियांचे समाजसुधारणेतील योगदान:सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात आज परिषद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र आणि एकता शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविद्यालय, बिडकीन यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी “भारतीय स्त्रियांचे समाजसुधारणेतील योगदान’ या विषयावर राष्ट्रीय परिषद होणार आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात उद्घाटन हाेईल. माजी आमदार एम. एम. शेख यांची प्रमुख उपस्थिती राहील. डॉ. वंदना सोनाळकर बीजभाषण करतील. डॉ. राजाभाऊ भैलुमे, डॉ. ए. जी. खान, डॉ. मेहरुन्निसा पठाण, प्राचार्य डॉ. नितीन आहेर, डॉ. उमेश बगाडे उपस्थित राहतील.

बातम्या आणखी आहेत...