आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांचा पैसा:उद्योगपती अदानींची संपत्ती जप्त करा; काँग्रेसचे एसबीआयसमोर आंदोलन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसबीआय आणि एलआयसीत गरिबांचा पैसा आहे. हा पैसा बुडाल्यास भारताची परिस्थिती श्रीलंकेसारखी होईल. त्यामुळे उद्याेगपती अदानींनी घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी करत काँग्रेसच्या वतीने साेमवारी सिडकाेतील एसबीआयसमाेर आंदाेलन करण्यात आले. पेटी, ढाेलकी वाजवत ‘खाऊंगा न खाने दूंगा, देश सारा बेच दूंगा, अदानी हटाव देश बचाव, हम दो हमारे हमारे दो, देश को बेच दो’ अशी घोषणाबाजी करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी केली. शिष्टमंडळाने बँकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वेळी शहराध्यक्ष युसूफ शेख, माजी मंत्री अनिल पटेल, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...