आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करमाड:औरंगाबादच्या ओबीसी मेळाव्यात गोंधळ, भाषणातून भुजबळांचा अवमान झाल्याची भावना; मंत्री वडेट्टीवारांच्या उपस्थितीत प्रकार

करमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथे शनिवारी ओबीसी व्हीजे/ एनटी जनमोर्चाच्या विभागीय बैठकीत प्रमुख मार्गदर्शक मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बालाजी शिंदे यांनी भाषणात मंत्री छगन भुजबळ यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्यांचे भाषण थांबवले व घोषणाबाजी केली. वडेट्टीवार यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

बाळासाहेब सानप यांनी बैठकीचे आयोजन केले. मात्र, पोस्टर्सवर आयोजक म्हणून असलेले सानप यांचे नाव, ओबीसी नेते म्हणून उल्लेख तसेच गोपीनाथ मुंडे यांचा फोटो यावरूनही नाराजी होती. मंत्री वडेट्टीवारांचा फक्त फोटो होता. नंतर बैठकीत शिंदे यांच्या भाषणाची यात भर पडली. बॅनरवर भुजबळ यांचा फोटो नव्हता. यावरूनही कार्यक्रमात खडाजंगी झाली.

औरंगाबादेतही निदर्शने : मंत्री वडेट्टीवार औरंगाबादेत सुभेदारी विश्रामगृहावर आले तेव्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे सुभेदारी विश्रामगृहात जोरदार निदर्शने करण्यात आली. ओबीसी आरक्षण बचाव मेळावे घेऊन वडेट्टीवार जाती-जातीत फूट पाडत आहेत, असा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा महासचिव रामेश्वर तायडे आदींनी केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser