आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल 'गो बॅक', औरंगाबादमध्ये घोषणा:क्रांती चौकात काँग्रेसनेही कोश्यारींच्या फोटोला मारले जोडे; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. कोश्यारींच्या विरोधात जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने आज मंगळवारी दुपारी क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कोश्यारींच्या फोटोला जोडेही मारले.

कोश्यारींच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली असून विविध राजकीय पक्ष संघटना यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी औरंगाबादहून सकाळीच भारत जोडो यात्रेसाठी रवाना झाले. त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत राज्यपालांविरोधात आंदोलन केले.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे व काँग्रेसचे औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली 'राज्यपालांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय ', 'गो बॅक कोश्यारी ' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय ' अशा जोरदार घोषणाबाजी करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फोटोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोडेही मारले.

आंदोलनाला जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, डॉ पवन डोंगरे आणि अनिस पटेल इक्बाल सिंग डॉ अरुण शिरसाठ, गुलाब पटेल कैसर बाबा, प्रकाश वाघमारे,सागर नागरे,चक्रधर मगरे रवी लोखंडे, बाळू गुजर, मंजू लोखंडे, स्वाती बसू, दीपाली मिसाळ दीक्षा पवार, सय्यद भैय्याजउद्दीन, लियाकत पठाण इरफान, इब्राहिम पठाण, उमाकांत कोटकर, अस्मत खान, सुनील डोणगावकर, अलंकार यावतकर, मुक्तार खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...