आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान जाहीर केले. त्यात प्रत्येकाला घरावर तिरंगा झेंडा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे अभियान सरकारी असले तरी भाजपने त्यावर कब्जा करत त्याला इव्हेंटचे रूप दिले आहे. त्यामुळे काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आझादी गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. त्यात ९ ते १५ ऑगस्ट कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसची ७५ किलोमीटर पदयात्रा निघणार आहे.
आजादी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते सचिन सावंत रविवारी औरंगाबादेत आले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
छत्रपती संभाजी महाराजांचे नाव असल्यामुळे विरोध नाही सावंत म्हणाले की, नवे सरकार येऊन आतापर्यंत ३७ दिवस झाले आहेत. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. काँग्रेसचा सर्व नामांतराला विरोध आहे. मात्र संभाजी महाराजांच्या नावाचा प्रस्ताव आल्यामुळे त्याला विरोध केला नाही. भाजपला सत्तेपासून हटवणे हेच काँग्रेसचे ध्येय असून त्यासाठीच महाविकास आघाडी एकत्र आली आहे. काँग्रेसची आझादी यात्रा राजकीय नसल्याने प्रत्येक नागरिकाने त्यात सहभागी व्हावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.