आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:काँग्रेसने केली कचरा डंपिंगची पाहणी; उद्धवसेनेला आला राजकारणाचा वास

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा वर्षांनंतर मनपा निवडणुकीमुळे त्यांना प्रश्न कळला : वैद्य

गेल्या सहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या रमानगर येथील कचरा डंपिंग ग्राउंडची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी (५ डिसेंबर) पाहणी केली. येथे कचरा साठवला गेला तर आंदोलन करू, असा इशारा शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी दिला. त्यांच्यासोबत अनिस पटेल, अनिता भंडारी, दीपाली मिसाळही होत्या. महापालिका निवडणुकीच्या राजकारणासाठी ही पाहणी असल्याचा आरोप उद्धवसेना, शिंदेसेनेकडून करण्यात आला आहे.

रमानगरात कचरा वाहतूक केंद्राचे डंपिंग ग्राउंड होऊ नये, यासाठी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा काँग्रेसने काहीही का केले नाही, असा वाडकर यांचा सवाल आहे. तर उद्धवसेनेचे माजी सभापती राजू वैद्य म्हणाले, सहा वर्षांनंतर काँग्रेसला प्रश्न कळला. यात राजकारणच आहे. पण लोक काँग्रेस नव्हे, आमच्यासोबत आहेत.

‘दिव्य मराठी’, नगरसेविका वाडकरांचा सतत पाठपुरावा निजामकालीन विहिरी बुजवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे शिल्पाराणी वाडकर म्हणाल्या.

निजामकालीन विहिरी बुजवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे शिल्पाराणी वाडकर म्हणाल्या. यात राजकारण नाही. लोकांची समस्या लक्षात येताच आम्ही मैदानात उतरलो. युसूफ शेख

सहा वर्षांनंतर प्रश्न कळला, हा आरोप चुकीचा आहे. आम्हीच हा प्रश्न आधी मांडला. अनिस पटेल

बातम्या आणखी आहेत...