आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहवामान खुलले आहे. जसा काँग्रेसचा हात खुलला आहे. कुठे कुठे पाऊस असा काही गायब झाला आहे जणूकाही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गहलोत यांचे नाव गायब झाले आहे. सूर्य पूर्ण ताकद लावत आहे, जसे अशोक गहलोत जोर लावत आहेत. कुठे कुठे अजूनही ढग भीती दाखवत आहेत, जशी दिग्विजयसिंहांनी एक व्यक्ती, एक पदाचा राग आवळून गहलोत यांना दाखवली होती. तरीही ऊन काँग्रेस हायकमांडप्रमाणे आहे. जास्त प्रभाव टाकताना दिसत नाही. उन्हातही चांदण्या चमकत असल्याचा भास होत आहे. असो, हवामान आणि राजकारण काही मर्यादेपर्यंत एकसारखेच असतात. भारतात तर अजूनही दोन्हींच्या बाबतीत काहीच निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही.
परिस्थिती कधी बदलेल हे कुणालाच माहीत नसते.तथापि, भविष्यवाण्या होत राहतात. हवामानाच्या होतात. राजकारणाच्यादेखील. दोघांची विडंबना ही आहे की, नेहमी भविष्यवाण्या चुकीच्याच ठरतात. हवामानाबाबत तर प्रत्येकाला माहीत असतेच. राजकारणात यापेक्षाही जास्त अनिश्चितता प्रत्येक वेळी असते. कधी चौधरी चरणसिंहांना आपला राम सांगत स्वत:ला त्यांचा हनुमान म्हणणारे राज नारायण हेच काही काळानंतर त्याच चरणसिंहांना चेअर सिंह म्हणत चिडवायला लागतात. कधी ओमप्रकाश चौटालांना मुलगा म्हणून ओळखण्यास नकार देणाऱ्या चौधरी देवीलाल हेच नातवाच्या समर्थनार्थ विश्वनाथ प्रताप सिंह सरकारला हादरवून सोडतात. त्यामुळे राजस्थानातील गोंधळामुळेही खूप जास्त गणित लावण्याची किंवा आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही. आज ७० ते ९० आमदारांची साथ असल्याचा दावा करत सचिन पायलट आणि अनेक मर्यादेपर्यंत पक्षाच्या हायकमांडलाही हादरवून टाकणारे गहलोत हेच उद्या चालून एकमेकांच्या गळ्यात हात टाकून दिल्लीच्या विमानातून उतरल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मोह वर्षभरासाठी सोडून देणे हेच पायलट यांच्यासाठी योग्य असते. कारण निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला तर संपूर्ण दोष त्यांनाच दिला जाईल.अशोक गहलोत आणि सचिन पायलट मिळून आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सामना करू शकले असते तरच राजस्थानात काँग्रेसचा फायदा झाला असता.
कारण स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षात जितके विखुरलेपण या वेळी दिसत आहे तितके कधीच दिसले नाही. आधी भारतीय जनता पक्षाकडून वसुंधरा राजे याच होत्या. इतर कुणीच नव्हते. आता असे नाही. सध्या मुख्यमंत्रिपदाचेच पाच-सहा दावेदार भारतीय जनता पक्षात आहेत.
अशा वेळी काँग्रेस फायदा घेऊ शकत होती. मात्र, काँग्रेस स्वत:चेच घर जाळून तमाशा पाहण्यात पटाईत आहे. त्यामुळे तमाशा सुरू आहे आणि भाजप बल्ले-बल्ले करत आहे. कारण त्यांच्यासाठी पुढील निवडणुकीचा मार्ग सोपा होत आहे. अचानकपणे राजस्थानातील संकटावर एखादा ठोस निर्णय एेकवण्याच्या मन:स्थितीत सध्या काँग्रेस हायकमांड दिसत नाहीत. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेसोबतच थोडा वेळ काँग्रेसला जोडण्यातही घालवला पाहिजे.
नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर navneet@dbcorp.in
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.