आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:काँग्रेस खासदार राजीव सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, प्रकृती विनिंग प्रोसेस मध्ये

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील तीन ते चार दिवसांमध्ये व्हेंटिलेटर पूर्णपणे काढले जाईल

कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना आता सोमवारी ता. १० नॉन कोविड वार्ड मध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय भाषेत त्यांची प्रकृती आता विनिंग प्रोसेस मध्ये असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

काँग्रेसचे खासदार सातव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव आल्यानंतर त्यांना पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये ता. २५ एप्रिल रोजी भरती करण्यात आले होते. मात्र ता. २८ एप्रिल रोजी त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आले होते. त्यांच्या आरोग्य तपासणी साठी पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल, पुणे हॉस्पिटल व सह्याद्री हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर सोबतच मुंबई येथील लीलावती रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर देखील दाखल झाले होते. मुंबईच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत. यांच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा झाली. ता. ६ मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र ही चाचणी देखील पॉझिटिव आल्यामुळे त्यांना कोरोना वॉर्ड मध्येच ठेवण्यात आले. तर खासदार सातवांकडून औषधोपचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे दिवसभरातून काहीकाळ त्यांना लावलेले व्हेंटिलेटर देखील काढले जात आहे.

दरम्यान रविवारी ता. ९ त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सदर चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना आज नॉन कोविड वॉर्ड मध्ये हलविले जाणार आहे. या ठिकाणी त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांचे पर्यवेक्षण असणार आहे. त्यांना लावण्यात आलेले व्हेंटिलेटर दिवसातून काही वेळ काढले जात आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृती मध्ये आणखी सुधारणा होऊ लागली आहे. वैद्यकीय भाषेमध्ये सध्या खासदार सातव विनिंग प्रोसेसमध्ये असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये व्हेंटिलेटर पूर्णपणे काढले जाईल असेही सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...