आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिद्धार्थ उद्यानातील दोन वाघिणी गुजरातेतील प्राणिसंग्रहालयाला पाठवल्या जाणार आहेत. याला अद्याप अवधी असला तरी या वाघिणी पाठवण्यास शहर जिल्हा काँग्रेसतर्फे विरोध दर्शवण्यात आला आहे. याबाबत शिष्टमंडळाने ६ डिसेंबर रोजी प्राणिसंग्रहालय प्रशासनाची भेट घेत निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले की, मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय सिद्धार्थ उद्यानात आहे. येथील प्रतिभा आणि रंजना या दोन वर्षांच्या दोन वाघिणी अहमदाबाद येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पाठवल्या जाणार आहेत. या वाघिणी तिकडे पाठवण्यास शहर जिल्हा काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लीडर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने प्राणिसंग्रहालयाला भेट देत उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रशासनाने मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी एकबालसिंग गिल, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, डॉ.अरुण शिरसाठ, नीलेश अंबेवाडीकर आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.