आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन - 9 मधल्या रस्त्यांवर मोठ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षभरापासून याबाबत तक्रारी केल्यानंतरही खड्डे बुजवले जात नसल्यामुळे नागरिकांना कंबर दुखी मान दुखी सारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसचे वतीने या विरोधात खड्ड्यांमध्ये फुले टाकून गांधीगिरी स्टाईल आंदोलन केले. हा रस्ता नाही सुधारल्यास महापालिकेवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी दिला आहे.
एन - 9 मधील बळीराम पाटील शाळा कडून टीव्ही सेंटर कडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याने प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे कायम गर्दी असते. मात्र हे दोन्ही रस्ते, रस्ते नसून मोठमोठे खड्डे असल्याचं दिसून आले आहे.
खड्ड्यात टाकली फुले
ही दोन्ही रस्ते पार करताना शेकडो खड्ड्यांमधून नागरिकांना जावे लागते. त्यामुळे मोठ्या त्रासाला या भागातील नागरिकांना सामोरे जावे लागते. या विरोधात काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी खड्ड्यांमध्ये गुलाबाची फुले टाकण्यात आली. महापालिकेने हा रस्ता दुरुस्त नाही केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा युसुफ शेख यांनी दिला आहे.
जी - 20 मध्ये काय दाखवणार ?
यावेळी शेख यांनी सांगितले की, औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे. शहरात आल्यानंतर त्यांना अशा खड्ड्यातून नेणार का? असा सवाल शेख यांनी केला आहे.
आंदोलनात यांचा होता सहभाग
यावेळी औरंगाबाद शहर जिल्हाअध्यक्ष शेख युसूफ, माजी नगरसेवक मोहसीन अहेमद, डॉ.पवन डोंगरे, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, अनिस पटेल,मोईन इनामदार,अरुण शिरसाठ, कैसर बाबा,श्रीराम इंगळे, आसमत खान, लियाकत पठाण, रवि लोखंडे, अॅड.सुनिता तायडे, उज्वला दत्त्त,अनिता भंडारी,दिपाली मिसाळ,स्वाती सरवदे,मंजु लोखंडे,मुददसिर अन्सारी सलीम खान,सय्यद फयाजोददीन,साहेब,स्वाती बासु आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.