आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सस्ती दारू महंगा तेल’‎:गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे क्रांती चौकात आंदोलन, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी‎

छत्रपती संभाजीनगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने गॅसची ५० रुपयांनी‎ दरवाढ केली आहे. याविरोधात‎ काँग्रेसने गुरुवारी क्रांती चौकात‎ आंदोलन केले. या वेळी गॅसचे‎ रिकामे सिलिंडर वाजवून, चुलीवर‎ भाकरी-भरीत करून दरवाढीचा‎ निषेध व्यक्त करण्यात आला. ‘कहा‎ गये भाई कहा गये, अच्छे दिन कहा‎ गये’, ‘वा रे मोदी तेरा खेल, सस्ती‎ दारू महंगा तेल’ यांसह‎ भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी‎ करण्यात आली.‎ काँग्रेसकडून गॅस दरवाढीला‎ जोरदार विरोध करण्यात येत आहे.‎ शहर, जिल्हा काँग्रेसने या‎ दरवाढीविरोधात आंदोलन केले.‎ गॅसचे सिलिंडर वाजवले :‎ काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ शेख,‎ डाॅ. पवन डोंगरे, सरोज मसलगे,‎ काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नामदेव‎ पवार यांनी गॅसचे सिलिंडर वाजवत‎ आंदोलन केले. या वेळी बांगड्या‎ हातात दाखवून मोदी सरकारचा‎ निषेध व्यक्त करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...