आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस पक्षातर्फे अदानी उद्योग समूहाच्या विरोधात स्टेट बँक अाॅफ इंडियासमोर सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आमदार राजेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ पटेल यांनी दिली.
अदानी समूहासाठी एलआयसी व एसबीआय यांना सार्वजनिक क्षेत्रातील विविध संस्थांचे कोट्यवधी रुपये गुंतवण्यास केंद्र सरकारने भाग पाडले. त्यामुळे एलआयसी, बँकेत असलेला नागरिकांच्या कष्टाचा पैसा परत मिळेल का, अशी भीती आहे. त्यामुळे बँकेसमोर आंदोलन करण्यात येत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
सिडको कॅनॉटमधील एसबीआयसमोर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्याचे प्रभारी, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे शेख यांनी कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.