आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हिंगोलीत काँग्रेसची निदर्शने, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी या मागणीसाठी हिंगोलीत काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. ३०) निदर्शने केली. शासनाने दरवाढ मागे घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

येथील महात्मा गांधी चौकात  काँग्रेस पक्षाने आज सकाळी ११ वाजता निदर्शने केली. यावेळी माजी आमदार डॉ. संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक  अॅड. गयबाराव नाईक,  नगरसेवक अनिल नेनवाणी, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते, कैलास साळुंखे, केशव नाईक, माजी उपनगराध्यक्ष बापूराव बांगर , विलास गोरे, अजय बांगर, एन. एस. बुद्रुक, मुजीब कुरेशी, बाजार समिती सभापती दत्ता बोंढारे, असगर पटेल, युवराज आवटे यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

यावेळी केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . सध्या कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना सरकारने इंधन दरवाढ करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असून केंद्राने तातडीने दरवाढ मागे घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन ही जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले.

0