आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात दिल्लीतील कुस्तीपटूंचा आंदोलनाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे याच वादग्रस्त प्रकरणात ब्रीज भूषण सिंह यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने क्रांती चौक मध्ये आंदोलन करण्यात आले आहे यामध्ये महिला काँग्रेसच्या वतीने मेणबत्ती पेटवून मुक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले आहे.
महिला काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकामध्ये संध्याकाळी सातच्या सुमारास मेणबत्ती पेटून दिल्लीतील कुस्तीपटू ना पाठिंबा दर्शविण्यात आला आहे यामध्ये काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी सहभागी झाले आहेत काँग्रेस महिलाशहराध्यक्ष दिपाली मिसाळ आणि जिल्हाध्यक्ष हेमा पाटील तसेच शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेत नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.
यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते पवन डोंगरे अनिस पटेल मोहित जाधव सागर नागरे इब्राहिम पठाण ,जयप्रकाश नारनवरे, मुदसीर अन्सारी ,शेख अथर ,अशोक डोळस,मुजफ्फर पठाण, सुमेध नारनवरे, हरचरणसिंह गुलाटी, तारा जाधव, हकिफ रझवी, कैसर आझाद, मदन सातपुते, शफीक बागवान यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
महिलांचा नारा आणि महिलांकडे दुर्लक्ष काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले की भाजपच्या वतीने किंवा महिलांचा नारा दिला जात आहे मात्र प्रत्यक्षात महिलांकडे दुर्लक्ष केले जात असून त्यांच्या अत्याचार प्रकरणात कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आम्ही हे आंदोलन केले असल्याचे शेख यांनी सागितले.
दिपाली मिसाळ म्हणाल्या, देशभरात मला काँग्रेसतर्फे या कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. आम्ही कॅण्डल पेटवून मूक मोर्चा काढला. महिलांच्या सुरक्षितेसाठी केवळ घोषणा हे सरकार करत असून प्रत्यक्षात त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या मागण्यांकडे कायम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी मिसाळ यांनी केला
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.