आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादचे सिद्धार्थ उद्यान हे मराठवाडामधील उद्यानाचे लोकप्रिय उद्यान असून मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येतात. मात्र, इथल्या दोन वाघीण गुजरातला नेण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने याला विरोध सुरू झाला आहे. शहर अध्यक्ष शेख युसुफ यांच्यासह 50 कार्यकर्त्यांनी मनपा ऊपायुक्त राहुल सुर्यवशी यांना निवेदन दिले. तसेच या दोन्हीही वाघीणीला गुजरातमध्ये नेऊ देणार नसल्याचा इशारा शेख युसुफ यांनी दिला आहे.
औरंगाबाद शहरातील सिध्दार्थ गार्डन मधील वाघीण प्रतिभा आणि रंजना या दोन वाघीण गुजरातला नेण्याच्या बाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने या वाघिणीला बाहेर नेऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
वाघिणीची गाडी अडवली जाणार
औरंगाबादचा सिद्धार्थ गार्डनमध्ये मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटन येतात तसेच बच्चे कंपनीचा आकर्षण देखील वाघिणी आहेत. त्यामुळे वाघिणी गेल्यास पर्यटकांची देखील निराशा होईल. त्यामुळे या विरोधात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेख यांनी दिला आहे. वाघिणी सिद्धार्थ गार्डन बाहेर जाऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच वाघिणीच्या बदल्यात मनपाचा सिद्धार्थ गार्डनला कोल्हे देण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
50 पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन
काँग्रेसच्या वतीने जवळपास 50 लोकांनी या विरोधात अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.यावेळी कदापि घेऊन जाऊ देणार नाही असा इशारा औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी मनपा प्रशासनास दिला. औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी असल्यामुळे पर्यटक महाराष्ट्रातून येऊन भेट देतात. जर हि वाघीण गुजरातला घेऊन गेले तर औरंगाबाद शहरातील सिध्दार्थ उद्यानवरील पर्यटन वर परिणाम होईल. या कारणामुळे पर्यटकांची निराशा होईल म्हणुन या दोन्ही वाघीणींना रंजना आणि प्रतिभा यांना सिध्दार्थ गार्डन येथेच ठेवावे असे मनपा प्रशासनास निवेदनाद्वारे सगनसांगीतले.
यावेळी शहर अध्यक्ष शेख युसूफ लिडर, इकबालसिंग गिल, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, डॉ.अरुण शिरसाठ, निलेश अंबेवाडीकर, शेख कैसर बाबा, एम.ए.अझर, अनिल माळोदे, विजय कांबळे,दिपाली मिसाळ,अनिता भंडारी, विजया भोसले, स्वाती सरवदे, मंजु लोखंडे, शिला मगरे, सय्यद रुबीना, हरचरणसिंग गुलाटी, शफीक शहा, जकीया बाजी, योगेश बहादुरे, चंद्रकांत मगरे, शिरीष चव्हाण, वैशाली तायडे, दिक्षा पवार, रवि लोखंडे, आनंद भामरे, मयुर साठे, यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.