आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महागाईिवरोधी आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘महाग’

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी व महागाई वाढत असल्याचा आरोप करत ५ ऑगस्ट रोजी काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलन झाले. औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यात कार्यकर्त्यांची वानवा जाणवली.

नवे प्रभारी शहराध्यक्ष युसूफ शेख बिल्डर यांच्या नेतृत्वातील हे पहिलेच आंदोलन होते. त्यामुळे शक्तिप्रदर्शन तसेच महागाईविरुद्ध जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने येतील अशी अपेक्षा होती. शहरातील ११५ पैकी किमान ८० वॉर्डांत काँग्रेसच्या शाखा आहेत. प्रत्येक शाखेतून किमान दहा जण येतील, असेही म्हटले जात होते. प्रत्यक्षात सुमारे शंभरच्या आंदोलक होेते. जिल्हा निरीक्षक मुजाहिद खान, माजी मंत्री अनिल पटेल, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, युसूफ शेख, प्रकाश मुगदिया आदींच्या नेतृत्वात त्यांनी घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष डॉ. काळे म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी आंदोलन असल्याने कदाचित येथे कार्यकर्ते कमी आले. युसूफ शेख यांनी सांगितले की, पदाधिकारी मात्र मोठ्या संख्येने आले होते.

बातम्या आणखी आहेत...