आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतमहोत्सव:तब्बल 200 वर्षांपासून जतन केलेल्या स्फटिकातील ज्योतिर्लिंगास अभिषेक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेडच्या चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तीनदिवसीय सोहळ्याचे आयोजन एन-७ येथील सप्तपदी मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. यामध्ये २०० वर्षे जतन केलेल्या स्फटिकाच्या ज्योतिर्लिंगास अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी कोल्हापूर येथून ११० औषधी वनस्पती आणण्यात आल्या आहेत.

तीन दिवसांच्या उत्सवात शतचंडी, ऐंद्री शांती, यजुर्वेद संहिता पारायण तसेच महादेवास बिल्वपत्रार्पण, गुरुदर्शन, गुरुदीक्षा, पाद्यपूजा, तुलादान, अन्नदान या कार्यक्रमांचा समावेश आहे. चिन्मयमूर्ती प्रतिष्ठानची आदिनाथांपासूनची परंपरा आहे. माधवानंद महाराज गुरुगादीवर बसलेले आठवे संन्यासी आहेत. शहरात या संस्थानचे ५० हजार अनुयायी आहेत. दरवर्षी महिनाभर वास्तव्यासाठी महाराज औरंगाबादेत येतात. यंदा त्यांचा अमृतमहोत्सव असल्याने तीनदिवसीय उत्सवाचे आयोजन केले आहे. साधारण ७ ते ८ लाखांचा खर्च भाविकांनी वर्गणीतून केला आहे.

बातम्या आणखी आहेत...