आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भ काढण्यास संमती:26 आठवड्यांचा गर्भ काढण्यास संमती ; गर्भपात करण्यास कायदेशीर परवानगी

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

26 आठवड्यांच्या गर्भात व्यंग असल्यामुळे संबंधित महिलेस औरंगाबाद खंडपीठाने गर्भपात करण्याची परवानगी दिली. गर्भातील बाळाचा पूर्ण विकास होऊ शकणार नसल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. त्या आधारे हा निर्णय देण्यात आला. शहरातील एका महिलेस २६ आठवड्यांपूर्वी गर्भधारणा झाली होती. या महिलेने ११ जून रोजी तपासणी केली असता गर्भातील बाळ जन्मास आल्यानंतर त्यास अपंगत्व येऊन त्याचा विकास पूर्ण होऊ शकणार नाही, असा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे संबंधित महिलेने अॅड. संदीप राजेभोसले यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करून गर्भपात करण्यासाठी परवानगी मागितली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊन घाटी येथील डॉक्टरांचा अहवाल मागवण्यात आला होता. हा अहवाल व अॅड. दिनेश चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. आर. व्ही. घुगे व न्या. ए. एल. पानसरे यांनी गर्भपात करण्यास कायदेशीर परवानगी दिली.

बातम्या आणखी आहेत...