आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागृती:संविधान जागरण रॅली शहरात ; महाड येथून अभियानाला प्रारंभ

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संविधानाची मूलतत्त्वे सर्वसामान्यांच्या मनामनात रुजावी, या हेतूने औरंगाबादेतील संविधान प्रचारक अनंत भवरे यांनी राज्यव्यापी संविधान जागृती अभियान हाती घेतले आहे. अभियान सोमवारी शहरात पोहोचले. भडकल गेट ते क्रांती चौक दरम्यान संविधान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भवरे यांनी २१ ऑक्टोबर २०२२ पासून महाड येथून संविधान जागृती अभियानाला प्रारंभ केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, बुलडाणा, जालना या जिल्ह्यांत भारतीय संविधानाविषयी जनजागरण करत रॅली सोमवारी औरंगाबादेत पोहोचली. दुपारी १२ वाजता या रॅलीची सुरुवात झाली. क्रांती चौकात समारोप झाला. अभियानाने अहमदनगर जिल्ह्याकडे प्रस्थान केले, असे कॉ. भीमराव बनसोड, प्रा. भारत सिरसाट आणि जितेंद्र भवरे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...