आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Constituency Development, Deal With Government For Minority Demands: MIM, Imtiaz's Explanation Regarding Rajya Sabha Elections; Disagreement With Shiv Sena Persists

इम्तियाज यांचे स्पष्टीकरण:मतदारसंघाचा विकास, अल्पसंख्याकांच्या मागण्यांसाठी सरकारशी सौदा, शिवसेनेशी मतभेद कायम

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत एमआयएमच्या दाेन आमदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला मदत केल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

या निर्णयाचे समर्थन करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकासकामे खोळंबली होती. ती पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीशी उघडपणे सौदेबाजी केली. शिवसेनेशी आमचे राजकीय व वैचारिक मतभेद हाेते अन‌् पुढेही राहतील. ही तडजाेड फक्त विकासाच्या मुद्द्यावर आहे.’

औरंगाबादेत शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून इम्तियाज खासदार झाले. त्यापूर्वीही २०१४ मध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इम्तियाज आमदार झाले हाेते. त्यामुळे औरंगाबादेत शिवसेना व एमआयममध्ये राजकीय वैर आहे. असे असताना राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला एमआयएमचे दाेन आमदार मदत करतील का, याविषयी शंका हाेती. मात्र एमआयएमच्या दाेन्ही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर इम्तियाज म्हणाले, शिवसेना, भाजप या दाेन्ही पक्षांशी आमचे वैचारिक व राजकीय मतभेद आहेत आणि ते राहतील. परंतु धुळे व मालेगाव येथील आमच्या मतदारसंघात विकासकामे झाली नव्हती. वक्फ बोर्डाच्या जागेवरील शासकीय इमारतीचे भाडे वक्फ बोर्डाला देण्यात यावे, एमपीएससी बोर्डात अल्पसंख्याक सदस्य नियुक्त करण्यात यावे आदी प्रलंबित मागण्या मान्य करून घेतल्यानंतरच आम्ही आघाडीला मदतीस राजी झालाे.’

पूर्वसंध्येला मुंबईत घडल्या नाट्यमय घडामाेडी
गुरुवारी दुपारपर्यंत एमआयएम कुणाला मतदान करील याविषयी सस्पेन्स हाेता. महाविकास आघाडीने थेट विनंती केली. आम्ही विचार करू, असे ओवेसींनी सांगितले हाेते. गुरुवारी सायंकाळनंतर मात्र मुंबईत घडामाेडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत इम्तियाज जलील, डाॅ. गफार कादरी यांची चर्चा झाली. ‘आम्ही या नेत्यांशी विकासकामांसाठी सौदेबाजी केली, त्यांनी ती मान्य केली म्हणून एवढ्या निवडणुकीपुरते आम्ही त्यांना सहकार्य केले,’ असे इम्तियाज म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...