आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथपत्र दाखल करण्याचे आदेश:‘बांधकाम अभियंत्यांनी खंडपीठात हजर राहावे’

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

याचिकाकर्त्याचा संपादित जमिनीचे भूभाडे देण्यासाठी केलेला अर्ज निकाली काढण्याचे आदेश असतानाही त्याचे पालन न करता उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्यमान व निवृत्त मुख्य कार्यकारी अभियंत्यांना २८ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष हजर राहून शपथपत्र दाखल करण्याचे आदेश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी दिले आहेत. याप्रकरणी श्रीपती अप्पाराव मुंडे यांनी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार मुंडे यांची बीड तालुक्यातील शिवनी येथील जमीन संपादित करण्यात आली होती. अर्ज करूनही त्यांना त्याचे भूभाडे मिळाले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...