आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस.बी.आय लाइफ इन्शुरन्स कंपनीला दणका:तक्रारदारास महिन्यात 1 लाख 30 हजार रुपये देण्याचे ग्राहक निवारण आयोगाचे आदेश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एस.बी.आस लाइफ इन्शुरन्स कंपनीला दणका बसला आहे. तक्ररदारास एका दिवसात 1 लाख 30 हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहे.

काय आहे प्रकार?

तक्रारदार भैय्यासाहेब राजेभोसले यांनी प्रतिवादी एस. बी. आय. लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. यांचेकडून युनिट प्लस रेग्युलर ही विमा पॉलिसी 2006 मध्ये घेतली होती. दि. 22/03/2006 रोजी तक्रारदार यांनी रू.50,000/- चा विमा हप्ता गैरअर्जदार यांच्याकडे जमा केला. पॉलिसीची मुदत दि. 21/03/2042 पर्यंत होती. परंतु, युनिट स्टेटमेंटच्या अनुषंगाने अर्जदार यांना एस. बी. आय. लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. यांनी टॉपअप प्रिमियम जमा करावे सांगितल्याने तक्रारदार यांनी एकूण रू.65,000/- हजार हे वेळोवेळी जमा केले होते. तक्रारदार यांनी एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याकडे एकूण रू.1,15,000/- जमा केले होते.

असे फेडले पैसे

दि. 10/05/2019 रोजी तक्रारदार यांनी एस. बी. आय. लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याकडे रु.15,000/- चा टॉपअप प्रिमियम जमा करण्यासाठी गेले असता, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. यांनी तक्रारदार यांचा चेक जमा करून घेतला नाही व दि. 03/07/2019 रोजी तक्रारदारास ट्रॅन्ड्रॉक्शन कम युनिट स्टेटमेंट पाठवले. त्यामध्ये तक्रारदाराची अर्जदाराची फंड व्हॅल्यू 10,000/- पेक्षा कमी असल्याने टॉपअप प्रिमियमची रक्कम स्वीकारता येत नाही असे कळवले व तक्रारदारास फंड व्हॅल्यूची रक्कम रू.6,543 स्वीकारावी असे सूचित केले. तक्रारदाराने एस.बी. आय. लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याकडे एकूण रु.1,15,000/- रक्कम जमा केलेली असून गैरअर्जदार यांनी अर्जदारास रू.6,543/- परत करून सेवेत त्रुटी दिलेली असल्याने तक्रारदार यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, औरंगाबाद येथे अँड. सुधीर धोंगडे यांचेमार्फत तक्रार दाखल केली होती.

एकच हप्ता भरल्याचा आरोप

एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. तर्फे युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदार याने युनिट प्लस रेग्युलर प्लॅन ही पॉलिसी घेण्यासाठी दि. 16/12/2005 रोजी प्रस्ताव सादर केलेला असून दि. 22/03/2006 रोजी विमा संरक्षित रक्कम रु. 2,50,000/- ची विमा पॉलिसी रु. 50,000/- प्रिमियम भरून घेतलेली आहे. पॉलिसीचा विमा हप्ता हा वार्षिक असून 36 वर्षे पॉलिसीची मुदत होती. पॉलिसीचा विमा हप्ता मुदतपूर्व भरून पॉलिसी चालू ठेवण्याची जबाबदारी ही विमाधारकाची आहे. अर्जदार यांनी एकच हप्ता भरलेला असून त्यानंतर हप्ता भरलेला नाही.

गैरअर्जदार यांना केवळ टॉपअप प्रिमियमचीच रक्कम प्राप्त झालेली आहे. तक्रारदार यांना केवळ टॉपअम प्रिमियमचीच रक्कम प्राप्त झाली. अर्जदार यांना वेळोवेळी युनिट स्टेटमेंट पाठवलेले आहे. पॉलिसीच्या शेड्युल 2 क्लॉज-2 व क्लॉज-13 नुसार अर्जदाराच्या पॉलिसीची फंड व्हॅल्यु रू.10,000/- पेक्षा कमी आल्याने दि. 22/05/2019 रोजीचा टॉपअप प्रिमियम गैरअर्जदार यांना स्विकारता आला नाही. क्लॉज 13 नुसार अर्जदाराची पॉलिसी ही रद्द झाल्याने फंड व्हॅल्युची रक्कम रू. 5,969/ दि. 28/11/2019 रोजी अर्जदाराच्या खात्यात जमा करण्यात आली. गैरअर्जदार यांनी सेवेत कुठलीही त्रुटी दिलेली नाही, तरी अर्जदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी. अशी विनंती केली.

खर्चापोटी 500 रु. दंड

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, औरंगाबाद चे अध्यक्ष स्मिता बी. कुलकर्णी, सदस्य किरण आर. ठोले, सदस्य श्रीमती संध्या बारलिंगे, यांनी तक्रारदारास, गैरअर्जदार एस. बी. आय. लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. यांनी रक्कम रू.1,10,001/- आदेश तारखेपासून तीस दिवसाचे आत द्यावेत तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- आदेश तारखेपासून तीस दिवसाचे आत द्यावेत असे आदेश पारीत केले. सदरील प्रकरणामध्ये तक्रारदार / अर्जदार भैय्यासाहेब राजेभोसले यांच्यावतीने अ‍ॅड. सुधीर घोंगडे यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...