आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाकर महाराज बोरसे यांचा भाविकांना संदेश:नोकरी-व्यवसाय सांभाळून भगवंताचे चिंतन गरजेचे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्याने नोकरी-व्यवसाय सांभाळून भगवंताचे चिंतन करायला पाहिजे, असा संदेश प्रभाकर महाराज बोरसे यांनी प्रवचनातून दिला. तिळवण तेली समाजातर्फे बुधवारी किराणा चावडी येथील तिळवण तेली समाज मंगल कार्यालयात संताजी जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुभाष थोरात यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा, अभिषेक करण्यात आला.

प्रभाकर महाराज बोरसे यांनी प्रवचनात “काय सांगू आता संताचे उपकार... मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई.. ठेवितो हा पायी जीव थोडा...’या तुकारामाच्या अभंगाचा दाखला देत प्रबोधन केले. ते म्हणाले की, संताचे या भूमीवर उपकार आहेत. ते माणसाला वेळोवेळी जागे करतात. आज मनुष्याला त्यांच्या कर्मामुळे देह मिळाला आहे. त्यामुळे प्रपंच, व्यवसाय, नोकरी करून भगवंताचे चिंतन करा,’ असा उपदेश दिला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...