आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमाणपत्र:बनावट जात प्रमाणपत्र काढून अवमान याचिका दाखल, पोलिसांवर गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट जात प्रमाणपत्र काढून शासनाची दिशाभूल करणे, त्याच्या पडताळणीसाठी समितीस सहकार्य न करणे, उलट समितीविरोधातच अवमान याचिका दाखल करणे या बेकायदेशीर कृत्यांबद्दल रावळा येथील सहायक पोलिस निरीक्षक राजू रसेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. त्यानुसार अनुसूचित जाती-जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपसंचालक चेतना दौलतराव मोरे यांनी रसेडे याच्या विरोधात सिडको ठाण्यात फसवणुकीचा आणि अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय जाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

समितीच्या वकिलांनी ही फसवणूक खंडपीठापुढे मांडली असता न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी राजू रसेडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले. तसेच, सिल्लोडच्या उपविभागीय कार्यालयाकडून बनावट कागदपत्रांआधारे जात प्रमाणपत्र मिळवल्याबाबतच्या सर्व कागदपत्रांचा पोलिसांनी शोध घेण्याचे आदेश दिले. स्वत: याचिकाकर्ता राजू रसेडे यानेही पोलिसांना सहकार्य करावे, असा आदेश देत न्यायालयाने रसेडे याची १ लाखांची अवमान याचिका फेटाळली आणि निकालास स्थगिती देण्याची त्याची विनंतीही फेटाळली.

समितीपुढे नायकडा जातीचा केला होता दावा
न्यायालयाने ९ महिन्यांत त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून द्यावी असे आदेश दिलेले असताना पडताळणी समितीचे सदस्य सचिव विजयकुमार कटके यांनी अशी पडताळणी न करून न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला आहे. राजू रसेडे यांनी २००४ मध्ये अमरावती येथील पडताळणी समितीपुढे नायकडा जातीचा दावा दाखल केला होता. त्या वेळी अमरावतीच्या पडताळणी समितीने त्यांचा दावा अवैध ठरवला होता. तरीही त्यांनी २०११ आणि त्यानंतर २०१७ मध्ये औरंगाबादच्या समितीपुढे जातीचे नवे दावे सादर केले.

बातम्या आणखी आहेत...