आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅटचे आदेश:वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरेपर्यंत सेवा कायम ठेवा ; वैद्यकीय अधिकाऱ्यांची याचिका

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे कायम भरेपर्यंत अर्जदारांची पदे समाप्त न करता अबाधित ठेवण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.आर.बोरा व प्रशासकीय सदस्य बिजयकुमार यांनी दिले आहेत.लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे डॉ. विनोद खेडकर व इतर दोघे ४ वर्षांपेक्षा जास्त काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासनाने त्यांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात केली होती. तरी ते आजतागायत या पदावर कार्यरत आहेत. २२ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ च्या ४२७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली.

या जाहिरातीअन्वये महाराष्ट्र शासनांतर्गत काम करणाऱ्या अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा समाप्तीची भीती वाटत असल्याने व काही वैद्यकीय अधिकारी वयोमर्यादा जास्त झाल्याने वैद्यकीय अधिकारी या पदास पात्र नसल्याने त्यांना या जाहिरातीचा लाभ घेता येत नव्हता. अर्जदारांनी ॲड. सुहास पी. उरगुंडे यांच्यामार्फत मूळ अर्ज दाखल केला. त्यांना ॲड. विद्या कोठुळे (उरगुंडे) व ॲड. रवींद्र वानखेडे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...